Aug 1, 2018

मित्राय

(पहिली चार कडवी मालिनी वृत्तातली)

दिनकर रवि सूर्या भास्करा भानु मित्रा
धगधग तव काया तेज ओती महीला
तुजसम जगती या कोण तेजाळ नाही
अरुण तव कृपेने काळ धावे अनंता  १.

मनुज नभचराला देशि ऊर्जा सजीवा
सकल फलफुलाला देह आकार दाता
हरित तरु लताही वंदिती द्वादशात्मे
अरुण तव कृपेने काळ धावे अनंता  २.

अचर चर सृष्टी सूर्यकिरणांत न्हाली
सुजलसुफल भूस्त्री सुंदरी सूरभार्या
सरि पवन गिरीही पूजती भास्कराला 
अरुण तव कृपेने काळ धावे अनंता  ३. 

ग्रह लघुग्रह उल्का धूमकेतू प्रदक्षी
तव पदकमलीते विश्व सारे नमीती
बलवर्धक मरीचि शोकहारी विधाता
अरुण तव कृपेने काळ धावे अनंता  ४. 

तमनाशक अर्का प्रीती दे जीवजीवा
सुखदायक मित्रा शक्ती दे सर्वसर्वा
आदित्य विरोचन रवि त्रैलोक्यस्वामी
मार्तण्ड ग्रहपति भूपति आसमंती  ५.

No comments:

Post a Comment