अप्पूघरचा एक हत्ती रडत कुढत बसला
म्हणला सगळे उगाच मला “ढब्बा अप्पू” म्हणतात
देवळात जाऊन मारुतीच्या जप करीत बसला
“लुकडा कर देवा मला,” आरती गाऊ लागला
एके दिवशी हत्ती दादा सारसबागेत गेला
पकडून त्याला कुणीतरी गावभर फिरवू लागला
“हत्ती आला, पैसा द्या,” माहूत म्हणू लागला
भोळाभाबडा माणूस त्याच्या पाया पडू लागला
शनिवारी हत्ती दादा पबमध्ये गेला
गंध लावून पगडी घालून कॉकटेल मागू लागला
हसले सगळे फिदीफिदी म्हणले हत्ती शाकाहारी

हत्ती म्हणला हरकत नाही, मला कोलेSस्टेरॉल नाही
मग म्हणला मी व्हिगन, मुक्या प्राण्यांस मारत नाही
गेल्या वर्षी हत्ती दादा पिंज-यामध्ये अडकून गेला
शिकागोच्या प्राण्यांसोबत कडक थंडीत गारठून गेला
मैत्रीणीच्या आठवणीने रात्र रात्र झुरू लागला
स्वदेशाच्या विरहाने हमसून हमसून रडू लागला
त्या वेळी गणपती बाप्पा हत्तीकडे धावून गेला
“तुझं माझं एकच दु:ख,” असे त्याला म्हणला
“जीममध्ये आपण जाऊ, भरपूर व्यायाम करू,
दहा दिवसांत दोघे आपण एकदम फीट होऊ”
हत्ती म्हणला, “त्यापेक्षा हरतालिकेचा उपास करू,
तुझ्या आईने डॅडींसाठी हाच त्रास सोसला होता”
दोघे गेले तळ्याकाठी शिकागोच्या लिंकन पार्कात
शंकर बाबा हसू लागला मिश्किलपणे हिमालयात