Mar 27, 2020

दारात अस्वल उभे आहे

आजी जप करीत आहे
आजा गप पडून आहे 
बाळ पाळण्यात झोपले आहे 
ताई झोका देत आहे
दारात अस्वल उभे आहे

सामान वाईच आणलं आहे 
आई चूल फुंकत आहे 
भाजी मिळत नसली तरी 
भाकर पोट भरवीत आहे
दारात अस्वल उभे आहे

पैका संपत आला आहे 
दूध पावडर थोडी आहे 
चाय फक्कड पिऊन माझा 
बाप बातम्या बघत आहे 
दारात अस्वल उभे आहे

शाळेस आता सुट्टी आहे 
सारेच पास होणार आहेत 
आजी म्हणते जगलो तर 
पास होण्यास अर्थ आहे 
दारात अस्वल उभे आहे

पाटी दप्तर माळ्यात आहे 
दादा व्हॉट्सअ‍ॅप बघत आहे
बिल भरले नसता त्याचा 
मोबाईल डेटा संपणार आहे 
दारात अस्वल उभे आहे
 
सारे रस्ते शांत आहेत 
मोदी विश्वास देत आहेत
घरात बाबा सिंह तरी 
बाहेर जायला घाबरत आहेत 
दारात अस्वल उभे आहे ...

Mar 24, 2020

काल-आज-उद्या- परवा- तेरवा

काल
'माझ्याकडे लक्ष द्या,' असे त्याने सुचवले
कोण? कुठला? एक अणु ! सारे म्हणू लागले
'माझ्याकडे लक्ष द्या,' असे तो म्हणाला
थोडेबहुत जगामध्ये मास्क घालू लागले
माझ्याकडे लक्ष द्या, असे तो केकाटला 
नेते बिते जगामधले थोडे लक्ष देऊ लागले
शांत बसून तो मात्र आपले काम करू लागला
पर्वा कुणाची न करता जगभर पसरू लागला  

आज

ठरवून सुद्धा त्याचा विचार आज कुणास थांबवत नाही
ठरवून सुद्धा त्याचा विषय आज टाळता येत नाही
ज्याच्या त्याच्या मुखी आज त्याचेच नाव गाजत आहे 
दिसत नसून त्याचे असणे कुणीच आज नाकारत नाही
घाबरून त्याला सगळेजण घरामध्येच भटकतात
घर नसलेले घाबरलेले इकडे तिकडे पळतात
शक्य तेवढे सारे व्यवहार ऑनलाईन करतात
नाही जमले तर सारे कामधंदे सोडून देतात

उद्या

उद्या काय होईल ह्याची काहीच खात्री वाटत नाही
ऑनलाईन नाहीत त्यांचे काय होईल ते माहीत नाही
कोट्यावधी लोक कुठून काय खातील माहीत नाही
बाधा ज्याला त्याच्या अंत्यायात्रेस कुणी येणार नाही
जागा संपता प्रेते कुठे पुरणार ते माहीत नाही
...

वेड लागता कुणीतरी ऑनलाईन सांत्वन करेल
लाखो कोटी लाईक वगैरे इंटरनेट वर मिळत राहतील
वीज जाता इंटरनेटची सारी गुर्मी उतरून जाईल 

परवा

आपले काम होईस्तोवर तो जाम जाणार नाही
आपला हेतू कधीच कुणास तो कधी सांगणार नाही
इतिहासात त्याचे नाव छापल्याशिवाय हलणार नाही
'जगणे तुझ्या हातात नाही,' ह्याची आठवण करून देईल

तेरवा 

???? ????? ??? ??

Mar 21, 2020

राज्य विषाणुंचे आले

राज्य विषाणुंचे आले आणि धाबे दणाणले ।।

येथे नियम वेगळे सारे सोवळे ओवळे
स्पर्श अस्पृश्यास होता सारे कसे जीवघेणे

पाळा सोवळे कडक हात धुवावे सतत
शिवाशीवीचे पालन करा संयामाने सारे

एक अदृश्य विषाणु पोखरतो फुफ्फुसांना
गोरगरीब श्रीमंत भेद नाहीच तयाला

ज्यांचे सैन्य बलाढ्य ते सारे भयभीत झाले
राष्ट्र धनिक तरीही पाणी तोंडचे पळाले

आज अचानक कसे सारे धर्म जैन झाले ?
मुखावर वस्त्र आले आणि धाबे दणाणले