उन्ह पावसाचा खेळ
झुले तुझ्या नयनांत
रेशमाचे ओले केस
टप टप सुख पडं
ढगांतून ...
गार वारा धार नभा
ओला श्वास धरतीचा
पाणी इथं पाणी तिथं
मन धुंद वेडपिसं
चिंब झालं...
मदनाचं मोरपीस
डोळं तुझं काळंभोरं
हृदयाची धडधड
मन माझं बावरलं
वीज पडं ...
उंच उंच झोका घेई
इंद्रधनु आसमंत
शेत डोलं वा-यावर
नभ कसं मिठी मारं
अवनीला ...
सुखाचही पाणी झालं
दु:खाचही पाणी झालं
सारं ओलं नवं कोरं
दिल कसं शहारलं
तुझ्या स्पर्शी...
No comments:
Post a Comment