Mar 24, 2017

मौन आपसुक


शब्द झाले मूक
भावनाही शुष्क
मन माझे वेडे
अश्रूही कोरडे

भावनेच्या वेदना
मनासी आवरेना
दु:खाच्या लाटा
हृदया पेलेना

श्वासाश्वासांतुनि
होई तुझे स्मरण
शब्द झाले मूक
मौन आपसुक