एक वेडी वेडी आई माझी लेक गं एकली
कशी कोरडी कोरडी नाही संगतीला कोणी
सात समुद्रापल्याड कधी सोडून घराला
कशी लेकीला गं धाडी ||१|| नाही राहिली राहिली ||२||
अशा खुल्या आठवाने लेकीलाही चार दिवस
आई आत गलबले होते आठवाचे कढ
पण सांगेल कुणाला आता सरावल्या जीवा
चिंब भाव मनांतले ||३|| नुरे कसलीच ओढ ||४||
व्यग्र विद्येच्या घरात घरसंस्काराच्या रेषा
राही विदेशी सुखांत होती पुसट पुसट
मनमान्या स्वातंत्र्यात नव्या जगाच्या दीप्तीचे
तिचे दिवस झुलत ||५|| वर इमले चढत ||६||
ठेव कोणाची असे ही चार आठ दिन जाता
नाही नाही उमजत होती गप्पागोष्टी चार
तिची राखण करण्या कुण्या परक्याचे धन
माझे दुबळे हे हात ||७|| मायबापा मनी भार ||८||