Apr 30, 2020

माणसा

लाख असशील गोरा तरी
सावली तुझी काळीच आहे 
कितीही सुंदर असलास तरी 
रक्त तुझे लालच आहे 
"निर्भीड मी!” म्हणलास तरी 
कुणाला तरी घाबरत आहेस 
हजार मित्र असले तरी 
कुठे तरी एकटा आहेस 
कोटी शोध लावलेस तरी 
खोपडीत तुझ्या अज्ञान आहे 
भलता चतुर असलास तरी 
नैराश्य तू भोगले असशील 
ढगात उडू शकलास तरी 
आज घरात बंदच आहेस 
फुशारकीने जगलास तरी 
मेल्यानंतर राख आहेस 
दैवयोगे जगलास तरी 
प्रिय व्यक्तीचा मृत्यु पाहशील 
हजार गोष्टी जाणल्यास तरी 
कुठेतरी शून्य आहेस