Jul 20, 2019

मी स्वप्न पाहिले होते

मी स्वप्न पाहिले होते, स्वातंत्र्याचे
मी ध्यास घेतला होता, स्वातंत्र्याचा
मी झपाटलेला होतो, स्वातंत्र्यासाठी
मी इकडे तिकडे फिरलो, स्वातंत्र्यासाठी

ती माझ्यामागे होती, तिन्हीत्रिकाळी
ती पिच्छा सोडत नव्हती, वेताळ जणू ती !
मी नको नको म्हणताना, पाठीस लागली
मी हाकलून देता माझ्या, डोईवर बसली

“अगं कोण, कोण तू वेडे?” पुसले मी तिजला
“मी तुझीच सावली, वेड्या !” कथली ती मजला
ते स्वप्न भंगुनी गेले, स्वातंत्र्याचे,
सावलीविना जगणे ते, मज नाही जमले