सखी साजणी
पूस नयन ते
नको अश्रू सुंदरी,
पुरे आता तो
शोक अनावर
धीर धरी सहचरी.
सांग मला तुज
पूस नयन ते
नको अश्रू सुंदरी,
पुरे आता तो
शोक अनावर
धीर धरी सहचरी.
सांग मला तुज
आठवते का
देवाघरची आई?
आण मनी तू
आण मनी तू
त्या ताताची
प्रीत गोड आगळी.
सांग मला तुज
काय हवे ते
नको अश्रू नयनीचे,
मागूनि पहा
तुज काय हवे
देईन तुला प्रियतमे.
सांग मला तुज
आवडते का
प्राजक्ताचे फूल?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
माहेरी हलकेच.
सांग मला तुज
प्रीत गोड आगळी.
सांग मला तुज
काय हवे ते
नको अश्रू नयनीचे,
मागूनि पहा
तुज काय हवे
देईन तुला प्रियतमे.
सांग मला तुज
आवडते का
प्राजक्ताचे फूल?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
माहेरी हलकेच.
सांग मला तुज
आवडते का
अथांग पाणी निळे?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
समुद्र लाटेकडे.
सांग मला तुज
आवडतो का
शांत रम्य परिसर?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
नदी किना-यावर.
सांग मला तुज
आवडते का
शुभ्र पांढरे हिम?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
त्या हिमशिखरावर
सांग मला तुज
आवडते का
पक्ष्यांचे कूजन?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
गर्द दाट झाडीत.
सांग मला तुज
आठवते का
बालपणीची सखी?
त्वरित घेऊनि
जाईन तुजला
उजळाया आठवणी.
एकच मागू
नको साजणी
तुझ्या सुहृदाकडे,
तुजवीण जीवन
नको कधी, तू,
श्वास जणू प्रियतमे.
No comments:
Post a Comment