Aug 12, 2018

काय करू, मी काय करू?

काय करू, मी काय करू? काय करू, मी काय करू?

आई म्हणते : डॉक्टर हो!

बाबा म्हणतात: लॉयर हो!

ताई म्हणते: सिंगर हो!

दादा म्हणतो: फुलटू काहीतरी हो!

काय करू, मी काय करू? काय करू, मी काय करू?

आजी म्हणते: 

आई एक कथे पिता दुज कथे दादा नि ताई तिजे 
काका काकु अळीमिळी गुपचिळी मामा अवंढा गिळे
सा-यांचे अइकूनि संभ्रम पडे निद्रा नि शांती उठे 
अस्वस्थी मन चित्त आणि तनूही स्वास्थ्यास धोका असे

कोणाचे बर ऐकशील बछड्या कोणास ठाऊक ते 
डोळे मीटुनि सांग तू तव मना चिंता कशाची नसे
आई बाप नि बंधू आणि भगिनी ह्यांचे मता ऐकुनी 
घेई निर्णय तूचि त्वा न डरता सामर्थ्य आणी मनी
 
जे वाटे मनसा तुझ्याच तनया त्यालाच तू पारखी 
सारासार विचार नीट करुनी अंदाज बांधी मनी
योग्यायोग्य असे अनिश्चित जगी ज्याने तयाचे जिणे
हे नाही तर ते परीस म्हणुनी आनंद वाटूनि घे 

मी म्हणतो: आजोबा, आजी कोणत्या  भाषेत बोलतेय? 

काय करु, मी काय करू? काय करू, मी काय करू?

आजोबा म्हणतात:  मला वाटतं, आजी शार्दूलविक्रीडित  भाषेत बोलत्येय. तिच्या कवितेचा आशय आधी समजून घे. मग काय करायचे ते पुढे बघू.

No comments:

Post a Comment