Oct 4, 2018

हिंदोळे

मनामधल्या हिंदोळ्यांनो
तुम्ही जरा शांत रहा
मानसीच्या हेलकाव्यांनो
तुम्ही थोडी विश्रांती घ्या
तुमच्या सततच्या कामामुळे
डोक्याचे नुसते कार्यालय झालंय
उगीचच नको असलेले,
गरज नसलेले, लांबण लावलेले,
कटु असलेले, फसलेले विचार
सारखे येरझारा घालतायत.
अहो, विचारांनो, थोडे धीराने घ्या.
धिम्या गतीने या आणि तडकपणे जा
का तुम्ही असं करता?
परिपक्वतेला जरा गाठता?
तिच्याशी थोडं हितगुज करता?
किंवा एखादं छोटं workshop च करा ना
कदाचित जरा कामाचा ताण कमी होईल
त्यामुळे चाललेली नील रक्तवर्णी द्रवाची
देवाणघेवाण थोडी सुकर होईल
कदाचित थोडा traffic jam टळेल

No comments:

Post a Comment