Oct 3, 2018

बुरसटलेला - आधुनिक

बुचकळ्यात पडता पडता
मवितो चित्त भक्तीत
संकटी प्रभूला शरण
ळते दुष्टांची संगत
लेवूनी प्रथेचे वस्त्र
लावतो टिळा सुसंस्कृत
हा बंधु पहिला आपुला - “बुरसटलेला” म्हणूया ह्याला 

डवळणी जाता जाता
धुरा न वाही संस्कारांची
नित्य नेमे अडखळताना
सले भय अथवा खेद असे त्याला?
तो बंधु दुसरा आपुला - “आधुनिक” म्हणूया त्याला

दोघांची होता टक्कर, मनी होई आकांडतांडव
परी संकट विघ्ने येता, दोघांची गट्टी का दणकट?
अपघाताने का असेना, दोघांची आता मिठी घट्ट
बुरसटलेला होई आधुनिक,आधुनिक बने का भाविक?
कोणास म्हणूया काय? ही बांधवे आपुल्याच मनात
 

No comments:

Post a Comment