Oct 6, 2018

दिनूचा देव

तुका म्हणे देव भक्तीभावात, दयाबुद्धीत, सत्संगात
आजीचा देव नामस्मरणात दिनूचा देव साबुदाण्यांत

एकादशी दिनू बटाटा भक्त देवाचा भास होई शेंगदाण्यात
आज नाही मोह पोह्यारव्याचा सात्विक नाश्ता खिचडी काकडीचा

नको पाणीपुरी नको मेदूवडा, गोड दही द्या साबुदाणा वडा
तूपाजी-याची खमंग फोडणी भगरीला देते आजी दिनूची 

शाळेला सुट्टी उपवासासाठी पाढे नव्हे गाऊ देवाची गाणी
पूजेचा प्रसाद किती साधासुधा आंबा, केळी, चिक्कू, पंचामृत

विठोबाचा वास पंढरपुरात रताळ्याचा वास आसमंतात
दिनू म्हणे देव दह्यात दुधात शेंगदाण्यांत साबुदाण्यांत

No comments:

Post a Comment