तिचं पत्र आलं अन् छातीत धडधडलं
मनी विचारांचं गूढ काहूर उठलं १
मनी विचारांचं गूढ काहूर उठलं १
का लिहिलं असेल? काय लिहिलं असेल?
कशी असेल ती? नवीन काय घडलं? २
का तोच शिळा भूतकाळ त्याच वेड्या आठवणी
तेच भावनांचे पूर अन् तेच खुसपट उकरणं ३
असं का झालं अन् तसं का नाही झालं?
तेच निरर्थक प्रश्न अन् बिनबुडाचे आरोप ४
जे विसारायचं तेच ती का आठवून देते?
नियती हात धुवून का पाठीस लागते? ५
सारं कसं माझं सुरळीत चालू होतं
ठरवलं तसंच तर सारं घडत होतं ६
अन् अवचित् आज कसं तिचं पत्र आलं?
छातीत धडधडलं गूढ काहूर माजलं ७
मनाचं मनाशीच नातं भाबडं अन् निरागस
एक मन प्रकटलं दुसरं मन बावरलं ८
No comments:
Post a Comment