Nov 6, 2018

घे सूड प्रिये !

घे सूड प्रिये, तू घाव घाल !
खंजीर काढ, छातीत मार ! धृ.

अनृत वदलो कांते चुकलो
“पुनश्च नाही,” वृथा बरळलो
मिथ्या वचने देतचि बसलो
ना दिले प्रेम, परि क्लेश फार !  १.

गणती नाही किती फसविले
किती कितीदा तुला त्रासले
पुन:पुन्हा मी वचन मोडले
बहु दु:ख दिले अंगार शार  २.

कांते चुकलो खोटे वदलो
क्षमा मागण्या मी घाबरलो
शरण तुला अजि पाया पडलो
रागाव सखे, दे शिव्याशाप !  ३.

आयुष्याच्या संध्याकाळी
तारुण्याची नशा उतरली 
लज्जा मज अंधारी भिववी
तू घाव घाल वा ठार मार !   ४

No comments:

Post a Comment