Aug 10, 2019

कधी तरी


कधी तरी कुठे तरी
कुणीतरीच भेटते
उगाच कारणाविना
जीवास जीव लावते
इथे तिथे पहा जरा
असे सदाच चालते
नसेल जे मनातही
तसे पुढ्यात ठाकते

कधी तरी कुणी तरी
जीवास जीव लावते
लहान कारणामुळे
उगाच सर्व संपते
इथे तिथे पहा जरा
असे सदाच चालते
असेल जे मनामधे
तसेच स्वप्न राहते 



No comments:

Post a Comment