Aug 7, 2019

ओल्या मातीचं सपन

आज आभाळ भरलं
नभी नभ पसरलं
ओल्या मातीच्या गंधाचं
मला सपन दिसलं

कुठं मोर दूरवर
नर्तनास आता सज्ज
कुठं चातक वनात
थेंब टिपण्यात गुंग

प्रेमी युगुलांच्या अंगी
आला शहारा फुलून
वारा सोसाट्याचा वाहे
घरी दारी अंगणात

ओल्या पावसा सुगंध
माझ्या दीर्घ प्रतीक्षेचा
आषाढाच्या गारव्याला
स्पर्श नव्या नवरीचा

एकएक थेंबासंग
सारं दु:ख बरसूदे
नव्या आशेची पालवी
मनामनाला फुटूदे

No comments:

Post a Comment