May 11, 2019

चस्मिस चस्मिस

चस्मिस चस्मिस दादा माझा
गोरा गोरा दिसतो
काळा कुत्रा सोबत घेऊन
बागेमध्ये फिरतो

बागेमध्ये फिरता फिरता
गो-या पोरी बघतो
गोरी गोमटी दिसल्यावरती
खुशाल शिट्टी मारतो

चस्मिस चस्मिस दादा माझा
टवाळ मवाळ दिसतो
गोरी मुलगी मागे वळता
लाजेने घाबरतो

गोरी मुलगी नजीक येऊन
“एक्सक्युझ मी” ती म्हणते
चस्मिस चस्मिस दादाची मग
फुलटू विकेट उडते

हातामध्ये गुलाब घेऊन
तिच्यापुढे तो झुकतो
चस्मिस चस्मिस दादा वेडा
प्रपोझ करून बसतो

"गेट् लॉस्ट, गेट् लॉस्ट" म्हणताना ती
मुरका मारून जाते
चस्मिस चस्मिस दादाची ती
उगाच फिरकी घेते

दादा हट्टी ! काजू, किशमिश,
बदाम, पिस्ते देतो
"मिस यु, मिस यु" म्हणताना तो 
फ्लाईंग किस् पण देतो

दादा झटपट मोबाईल घेऊन
"नंबर दे ना," म्हणतो
गो-या गो-या गालावर मग
मोठ्ठी थप्पड घेतो

चस्मिस चस्मिस दादाला मी
चॉकलेट चिवडा देते
गो-या गो-या दादाची मी
समजूत काढू लागते

दादा दादू दादुटल्याला
काळा गॉगल देते
काळ्या गॉगलमधून गोरी 
त्याला काळी दिसते

No comments:

Post a Comment