May 8, 2019

कुणास माहित?

कुणास माहित पुढे काय ते,
उद्या कोणती कथा?
आयुष्याच्या चित्रपटाची अनोळखी पटकथा

नसेल सोबत आजि कुणीही
म्हणून का घबराट?
धीर धरा कुणी असेल अजुनी नाही संपली गोष्ट

असतील सारे सोबत तरीही
नाही कुणा शाश्वती
काय कुणाच्या पुढ्यात असती नसे कशाची ग्वाही

आयुष्याच्या चित्रपटाचा
नायक बदले सदा
खलनायक जो असेल आजि मित्र कदाचित उद्या

जगलो ऐंशी वर्षे तरीही
शहाणपण ते नाही
केस पांढरे झाले तरीही माहित नाही काही

पाहात राहू आपण सारे
दुजा कोणता मार्ग?
आयुष्याच्या चित्रपटाचे नवे अजनबी भाग

No comments:

Post a Comment