May 10, 2019

राधा

सदा वाजती मनात माझ्या
सूर तुझ्या मुरलीचे
गीत मधुर ते मोहविते मज
भाव तुझ्या प्रेमाचे कृष्णा, भाव तुझ्या प्रेमाचे 

मिटते डोळे दिसते तरिही
तुझीच प्रतिमा कृष्णा 
लाजविते मज रूप मनोहर 
तनमन मोहरते रे सखया, तनमन मोहरते रे

वसते मनात प्रीत तुझीच
हृदयस्पंदनी तूच 
तनमन जडले तुजवर कृष्णा
तुजविण पळभर नसते सखया, तुजविण पळभर नसते

राधा म्हणती जगती मजला
प्रिया हरिची विरळा
राधावल्लभ म्हणती तुजला
कोण भाग्य हे माझे नाथा, कोण भाग्य हे माझे !

उगा गुंफते प्रीत आपुली
शब्दांच्या मालेत
असीमित प्रीती, अतूट नाते
जन्मोजन्मींचे आपुले सुहृदा, जन्मोजन्मींचे आपुले

No comments:

Post a Comment