सुई
मैत्रीण
दु:ख
एक सुई गजरा करते
एक मैत्रीण गजरा देते एक दु:ख तीळाएवढे
एक सुई काटा काढते एक मैत्रीण कटकट करते एक दु:ख ढगाएवढे
एक सुई कपडे शिवते एक मैत्रीण गप्पा मारते एक दु:ख रेशमी वेडे
एक सुई ठिगळ लावते एक मैत्रीण विनोद करते एक दु:ख भुकेल्याचे
एक सुई कशिदा काढते एक
मैत्रीण मॅडच असते एक दु:ख निद्रानाशाचे
एक सुई दिशा दाखवते एक
मैत्रीण औषध आणते एक
दु:ख आजाराचे
एक सुई चप्पल शिवते एक मैत्रीण जीव लावते एक दु:ख मृत्यु झाल्याचे
एक सुई स्वेटर विणते एक मैत्रीण रुसते फुगते एक दु:ख नोकरी गेल्याचे
एक सुई माळा करते एक
मैत्रीण हरवून जाते एक दु:ख अपयशाचे
एक सुई हृदय शिवते एक मैत्रीण नवीन मिळते एक दु:ख
नसेल त्याचे
एक सुई इंजेक्शन देते एक
मैत्रीण नावे ठेवते एक दु:ख असलेल्याचे
एक सुई बोटात घुसते एक
मैत्रीण खास असते एक दु:ख
बदल झाल्याचे
एक सुईण बाळ देते एक
मैत्रीण खूप हसवते एक
दु:ख विस्मरणाचे
एक सुई टॅट्यू काढते एक
मैत्रीण भन्नाट वागते एक दु:ख वय झाल्याचे
एक सुई वही बांधते एक
मैत्रीण खूप रडवते एक दु:ख उगाचच ते !
एक सुई टोचते तरी एक
मैत्रीण टोचते तरी एक दु:ख संपले तरी
किती गोष्टींत कामी पडते खरे
तेच सांगून जाते खूप काही शिकवून जाते
No comments:
Post a Comment