May 9, 2020

फळा

आजकाल माझ्याकडे ढुंकून कुणी बघत नाही 
बरेच आहे ! अंगावरती टोचून कुणी लिहीत नाही

काळ्याकुट्ट शरीरावर चार पांढ-या रेघा ओढून 
अक्कलशून्य मुलांपुढे डोके कुणी फोडत नाही

दर वर्षी बघत असतो मास्तरांचे अंगविक्षेप 
दर वर्षी थक्क होतो पाहून त्यांचे यत्न मी
 
दर वर्षी कंटाळतो मी तेच तेच धडे ऐकून 
ज्ञान देण्यात ज्ञान घेण्यात मधेच कुठून येतो मी?

असतात मोजकेच काही जण, कष्ट करून शिकतात जे 
असतात थोडेच चौकस काही, विचार करतात नवीन जे

आज कसे सारे शांत -- शिपाई पण येत नाही ! 
धूळ बसता अंग माझे साफ कुणी करत नाही

कधी वाटते एकटे एकटे, रडता सुद्धा येत नाही 
न जाणो माझी गरज नंतर कधी राहील, नाही ?

ऐकतो असे, माझ्यापेक्षा संगणक आहे खूप दु:खी 
 त्याच्यामध्ये असून सगळे कुणीच काही शिकत नाही

No comments:

Post a Comment