May 21, 2020

Quarantine


बंद घरात बंद भिंतींत खिडक्या लावून आढ्याकडे शून्यात पाहून मीच मला विचारते :
"कशी आहेस तू? काय केलेस तू ? टेस्ट पॉझिटिव्ह येईल का?
खोकला बरा होईल का? खायला पुरेसे असेल का? मदत कुणी करेल का?
नोकरीवरून काढतील का? पूर्वीसारखे होईल का? किती जण आज गेले?

किती जण पछाडले? फेसबुक वरचे लाईक देणारे हजार मित्र कुठे गेले ?"
उत्तरशून्य अनेक प्रश्न मीच मला विचारते
अन् इतके दिवस अज्ञानाने झाकोळलेले
एक सत्य सहजगत्या पुठे ठाकते :

किती देशांत गेलीस तरी
किती भाषा बोललीस तरी
किती मित्र केलेस तरी

खरी तू एकटीच असतेस
आणि दुस-यांसोबत
तुझी एक प्रतिमा असते
फक्त एकच प्रतिमा... 

No comments:

Post a Comment