Feb 10, 2020

पर्वा

सांगा कुणाला पर्वा आपुली?
आली संकटे तशीच गेली!

लहानपणी भोंगा काढता
दाटते आई दुर्लक्ष करी
सांगा कुणाला पर्वा आपुली?

शाळेत जेंव्हा नंबर काढी
'एवढे काय त्यात?' बाबा म्हणती
सांगा कुणाला पर्वा आपुली?

उंची वाढली साडेपाच फूट
सहा फूटवाले बुटकी म्हणती
सांगा कुणाला पर्वा आपुली?

आजी निघाली देवाच्या घरी
मित्र म्हणाला ‘म्हातारे मरती’
सांगा कुणाला पर्वा आपुली?

बाबांचे किती गुडघे दुखती
डॉक्टर तिथे दुर्लक्ष करती 
सांगा कुणाला पर्वा आपुली?

करा ते भोगा, संत म्हणती 
काही न करता भोग लाभती
सांगा कुणाला पर्वा आपुली?

सरळ जाता वाट वाकडी
कळेना कुठली जुनी दुष्मनी?
सांगा कुणाला पर्वा आपुली?

No comments:

Post a Comment