Nov 16, 2019

धागा धागा

धागा धागा कवितेचा धागा
गुंफून ठेवेल तुला नि मला

सरतील दिन सरेल आयु
विरतील स्वप्ने काळाच्या आड
हसतील दिन रडतील रात्री
येईल वसंत शिशिराच्या दारी

जाईल जीवन वेगळ्या मार्गे
घडतील कथा आपुल्या भिन्न
भिन्न कथांच्या कविताही भिन्न
गुंफतील सख्या तुला नि मला

जीवनपटी सारे आपण
खेळतो खेळ संसार-संसार
कोणावर राज्य कधी येईल ?
कोणता खेळ कधी उलटेल ?

संसारखेळी हरतो ना कोणी
हरेक अनुभव सुख दु:ख सारे
गुंफून ठेवेल तुला नि मला
धागा धागा कवितेचा धागा

No comments:

Post a Comment