Nov 1, 2019

एकमेकांसाठी जगू

एक वाटोळी धरती
सूर्याभोवती फिरते
अब्ज जीव तिच्यासवे
मार्ग कंठती एकटे

कसे एकटे दुकटे
भार पेलती दु:खाचे
विनाकारण जणू ते
सारे जन्मती जीव ते

अर्थ थोडासा जीवना
आपणच आता देऊ
एकमेकांच्या दु:खाला
थोडे सावरू सावरू

नव्हे अचानक सारे
इथे आपण अवनी
कदाचित जन्मांचेही
बंध आपुल्या सा-यांचे

धागे धागे आयुष्याचे
साथसंगतीने बांधू
धाग्याधाग्यांनी संबंध
एकमेकांसाठी जोडू

एकमेकांसाठी जगू
एकमेकांसाठी हासू
सुखदु:खाचे डोंगर
एकमेकांसाठी चढू

No comments:

Post a Comment