Nov 13, 2019

बहाणे


उडला सुगंध उरले निर्माल्य
कालचा दरवळ रेंगाळे मनात

सुकलेली सुमने आता फेकून देणे
नवीन फुलांची पुन्हा वाट पाहणे

फुले फुलण्याची किती ती ओढ!
नवी आशा देई मनास उभार

येतील पुन्हा नवीन कुसुमे
जुन्याचे निर्माल्य मागे सारून

मिळेल पुन्हा नवा सुगंध
थोड्याश्या घटका देतील आनंद

कसले हे जिणे ? काय ते जाणणे ?
कळल्या न कळल्याचे किती बहाणे ?

No comments:

Post a Comment