Nov 10, 2019

भाग्य तुझे


घे तळहाताशी भाग्य तुझे तू हाती
जर करावयाचे काही तुज तुजसाठी

ते मूर्ख सदा जे दैवावर अवलंबून
ते दुबळे जे दैवास दोष देती अन

घे असा पवित्रा दुर्भाग्य तुझे बिचकेल
अन सुभाग्य नकळत दारी तुझ्या येईल

ते शोध गड्या जे नाही शोधिले कोणी
अन देख असे जे नाही पाहिले कोणी

जरी नसतील बांधव मायबाप वा सारे
असतील सवे ते चंद्र सूर्य अन तारे

येईल कदाचित ईश तुझ्या दारात
दे कणभर छ्द्मी हास्य त्यास पदरात

1 comment: