एका भूकंपी पडते
घर शंभर वर्षांचे
एका पूरात बुडते
गाव हजार घरांचे
एका आगीत जळते
रान दुर्मिळ वृक्षांचे
एका अणुस्फोटी नष्ट
अब्ज जीव धरतीचे
एका व्याधीने मरण
तान्ह्या मुलासही येते
एका निराशेच्या क्षणी
सारे संपले वाटते
एका क्षणाचे सामर्थ्य
सारे माहीत असून,
किती आश्चर्य वाटते
एका तुटल्या नात्याचे ...
घर शंभर वर्षांचे
एका पूरात बुडते
गाव हजार घरांचे
एका आगीत जळते
रान दुर्मिळ वृक्षांचे
एका अणुस्फोटी नष्ट
अब्ज जीव धरतीचे
एका व्याधीने मरण
तान्ह्या मुलासही येते
एका निराशेच्या क्षणी
सारे संपले वाटते
एका क्षणाचे सामर्थ्य
सारे माहीत असून,
किती आश्चर्य वाटते
एका तुटल्या नात्याचे ...
No comments:
Post a Comment