Sep 1, 2019

एक भिकारी

एक भिकारी ऐन दुपारी
आज अचानक आला दारी
हात जोडूनी भाकर मागी
खपाटलेले पोट दाखवी
गर्व केवढा श्रीमंतीला !
भुका धाडीला तसाच त्याला
केविलवाण्या नजरेमधुनी
जहर पाझरी माझ्या हृदयी

हिशोब ह्याचा गगनी झाला- कणभर पाप मिळाले मजला

खिडकीमधुनी पाहून त्याला
कुणी माऊली घरी बोलवी
चार घास अन् जुनी लक्तरे
लेवून त्याला पाणी देई
डबडबलेले त्याचे डोळे
लाजिरवाणे झुकते झाले
कृतज्ञ त्याच्या नजरेमधुनी
आशीर्वचने तिजला देई

हिशोब ह्याचा गगनी झाला- अगणित पुण्य मिळाले तिजला

No comments:

Post a Comment