Sep 11, 2019

माझ्याच खुणा

काळीज आता तू फोडले तरीही
    कालचे काही मी देणार नाही 

आता गं पूर्वीचे उरले नाही
    आधीचा आता मी राहिलो नाही
काळाचा फेरा मला न चुकला
    सांभाळ स्वत:ला, मी तिथे नाही

नको उगा आता वाट तू पाहू
    वांझ गाईला नाही वासरू
काळ्याभिन्न नभी चमकेल वीज
    पाऊस तरीही येणार नाही

फुकटच्या आशा वसंत पालवी
    सारे खेळ तुला भुलविण्यासाठी
जातो मी सतत पुढच्या गावी
    धावू नको कुठे दिसणार नाही 

सोड सखे आता पाठलाग तुझा
    नाही तिथे काही शोधू नको बाई
मीट डोळे वा उघड डोळे
    दिसतील सर्वत्र माझ्याच खुणा

काळीज आता तू फोडले तरीही
    कालचे काही मी देणार नाही
मी कोण, मी कोण, मी कोण तुझा ?
    काळ मी, काळ मी, काळ मी कालचा !

No comments:

Post a Comment