Mar 24, 2020

काल-आज-उद्या- परवा- तेरवा

काल
'माझ्याकडे लक्ष द्या,' असे त्याने सुचवले
कोण? कुठला? एक अणु ! सारे म्हणू लागले
'माझ्याकडे लक्ष द्या,' असे तो म्हणाला
थोडेबहुत जगामध्ये मास्क घालू लागले
माझ्याकडे लक्ष द्या, असे तो केकाटला 
नेते बिते जगामधले थोडे लक्ष देऊ लागले
शांत बसून तो मात्र आपले काम करू लागला
पर्वा कुणाची न करता जगभर पसरू लागला  

आज

ठरवून सुद्धा त्याचा विचार आज कुणास थांबवत नाही
ठरवून सुद्धा त्याचा विषय आज टाळता येत नाही
ज्याच्या त्याच्या मुखी आज त्याचेच नाव गाजत आहे 
दिसत नसून त्याचे असणे कुणीच आज नाकारत नाही
घाबरून त्याला सगळेजण घरामध्येच भटकतात
घर नसलेले घाबरलेले इकडे तिकडे पळतात
शक्य तेवढे सारे व्यवहार ऑनलाईन करतात
नाही जमले तर सारे कामधंदे सोडून देतात

उद्या

उद्या काय होईल ह्याची काहीच खात्री वाटत नाही
ऑनलाईन नाहीत त्यांचे काय होईल ते माहीत नाही
कोट्यावधी लोक कुठून काय खातील माहीत नाही
बाधा ज्याला त्याच्या अंत्यायात्रेस कुणी येणार नाही
जागा संपता प्रेते कुठे पुरणार ते माहीत नाही
...

वेड लागता कुणीतरी ऑनलाईन सांत्वन करेल
लाखो कोटी लाईक वगैरे इंटरनेट वर मिळत राहतील
वीज जाता इंटरनेटची सारी गुर्मी उतरून जाईल 

परवा

आपले काम होईस्तोवर तो जाम जाणार नाही
आपला हेतू कधीच कुणास तो कधी सांगणार नाही
इतिहासात त्याचे नाव छापल्याशिवाय हलणार नाही
'जगणे तुझ्या हातात नाही,' ह्याची आठवण करून देईल

तेरवा 

???? ????? ??? ??

No comments:

Post a Comment