कधी वाटते लहान व्हावे कधी वाटते मोठे व्हावे
लाडू खावे भातुकलीचे १ दुखले तरी हसण्यासाठी २
कधी वाटते बाबा व्हावे कधी वाटते पक्षी व्हावे
दादापेक्षा उंच व्हावे ३ उडून जावे आभाळात ४
कधी वाटते कदंब व्हावे कधी वाटते पाऊस व्हावे
चमचम काजवे बघण्यासाठी ५ धो धो गारा पाडण्यासाठी ६
कधी वाटते बाप्पा व्हावे कधी वाटते शिक्षक व्हावे
एकवीस मोदक गट्ट करावे ७ पंधरं बारे कळण्यासाठी ८
कधी वाटते गायक व्हावे कधी वाटते लेखक व्हावे
अआ इई गात रहावे ९ पाने पाने लिहीत बसावे १०
कधी वाटते पुस्तक व्हावे कधी वाटते गरीब व्हावे
ग्रंथालयात उंच बसावे ११ पिंपळाखाली झोपी जावे १२
कधी वाटते पोलीस व्हावे कधी वाटते घड्याळ व्हावे
तुरुंग कैदी पाहून यावे १३ टक् टक् टिक् टिक् करत रहावे १४
कधी वाटते ऋषीच व्हावे कधी वाटते आभाळ व्हावे
मौनव्रत मी करत बसावे १५ चंद्रचांदण्या शिंपीत जावे १६
कधी वाटते स्वर्गी जावे स्वर्गी जाऊन तिथे रहावे
देव किती ते मोजून घ्यावे १७ द्यावी सुट्टी देवांनाही १८

No comments:
Post a Comment