Jun 2, 2020

एक एक सारे मित्र


लहानपणी एक मित्र वेडाखुळाच होता
चिंचा बोरे माझ्यासाठीच गोळा करीत होता

आणि मग होता एक मला आवडलेला
त्याच्याकडचा माझा पत्ता कुठे होता हरवला ?

तारुण्यात भेटला एक त्याच वयास साजेसा
आणाभाका घेऊनही न सांगता गायब झाला !

त्यानंतर नशीब म्हणून एक जण भेटला
सखा सोबती जीवनातला साथीदार झाला

पुढे भेटले अनेक मित्र आयुष्यातल्या टप्प्यांवर
नोकरी धंदा शिक्षण घेण्या गेले विखरून जगभर

म्हणता म्हणता डोक्यावरचे केस पांढरे झाले
नव-याआधी जाण्याइतके भाग्य नाही लाभले

हळू हळू एक एक सारे मित्र हरवून गेले
जाता जाता जगण्यामधले खूप काही शिकवून गेले

No comments:

Post a Comment