गुलाल उधळे हवेत मिसळे
व-हाड वधूचे गावांत थडके
विवाह मुहूर्त उद्याच पहाटे
घाबरा घुबरा वर थरकांपे १.
वाजंत्री तुतारी सनई चौघडे
दाराला तोरण रांगोळी रंगीत
गुलाब केशरी झेंडू फटाकडे
जिलेबी पुरण श्रीखंड पानांत २.
दारांत पाहून वधूच्या वेषात
सुंदर गोजिरी नवरी पुढ्यात
साक्षात मोहिनी मेंदीत रंगली
छातीत धडकी वराच्या भरली ३.
मनात वादळे काळीज थर्थरे
पोटांत गोळा नि पाय लटपटे
चढतां बोहला ब्रह्मांड आठवे
मंगलाष्टकांत “सावधान” ऐके ४.
संसारा भिऊन रामाला शरण
देवाला स्मरून क्षणिक ध्यानस्थ
विवाह मोडून फरार तेथून
द्वादश वर्षीय नारायण पळे ! ५.
व-हाड वधूचे गावांत थडके
विवाह मुहूर्त उद्याच पहाटे
घाबरा घुबरा वर थरकांपे १.
वाजंत्री तुतारी सनई चौघडे
दाराला तोरण रांगोळी रंगीत
गुलाब केशरी झेंडू फटाकडे
जिलेबी पुरण श्रीखंड पानांत २.
दारांत पाहून वधूच्या वेषात
सुंदर गोजिरी नवरी पुढ्यात
साक्षात मोहिनी मेंदीत रंगली
छातीत धडकी वराच्या भरली ३.
मनात वादळे काळीज थर्थरे
पोटांत गोळा नि पाय लटपटे
चढतां बोहला ब्रह्मांड आठवे
मंगलाष्टकांत “सावधान” ऐके ४.
संसारा भिऊन रामाला शरण
देवाला स्मरून क्षणिक ध्यानस्थ
विवाह मोडून फरार तेथून
द्वादश वर्षीय नारायण पळे ! ५.
No comments:
Post a Comment