आला आला भाजीवाला दादाताई भाजी घ्या ना
हिरवी मेथी शेपू अळू कंदमुळे घेई बाळू
लालभोपळा दुधीभोपळा सुरण पावटा कोबी मुळा
मूग मटकी सोले कोहळा आजीबाई भाजी घ्या ना १
आला आला भाजीवाला शेवगा घेवडा स्वस्त झाला
गाजर फुलवर संत्री केळी चुका दोडका तोंडली वांगी
आजी येई ताई येई हिरवी मिरची भेंडी घेई
आला आला भाजीवाला ताजीताजी भाजी घ्या ना २
सुगरणबाई वाट पाही भाजीवाल्या यादी देई
टवटवीत कोथिंबीर नागमोडी पडवळ
ताजा पालक हरबरा पोटासाठी माठ बरा
कांदापात नारिकेल आले लिंबू केळफूल ३
भाजीवाला, भाजीवाला, बाळू, बबडी हाक मारी
आलो, आलो, असा आलो, भाजीवाला धावत येई
एके दिनी काय होई भाजीवाला बुट्टी मारी
आजीबाई वाट पाही भाजीवाला गायब होई ४
जुनापाना वाडा पडी गडगंज मॉल होई
सारे तिथे भाजी घेती ताई माई सासूबाई
भाजीवाला दु:खी होई व्यथा त्याची कुणा सांगी
पोटावर पाय येई कपाळावर हात मारी ५
हिरवी मेथी शेपू अळू कंदमुळे घेई बाळू
लालभोपळा दुधीभोपळा सुरण पावटा कोबी मुळा
मूग मटकी सोले कोहळा आजीबाई भाजी घ्या ना १
आला आला भाजीवाला शेवगा घेवडा स्वस्त झाला
गाजर फुलवर संत्री केळी चुका दोडका तोंडली वांगी
आजी येई ताई येई हिरवी मिरची भेंडी घेई
आला आला भाजीवाला ताजीताजी भाजी घ्या ना २
सुगरणबाई वाट पाही भाजीवाल्या यादी देई
टवटवीत कोथिंबीर नागमोडी पडवळ
ताजा पालक हरबरा पोटासाठी माठ बरा
कांदापात नारिकेल आले लिंबू केळफूल ३
भाजीवाला, भाजीवाला, बाळू, बबडी हाक मारी
आलो, आलो, असा आलो, भाजीवाला धावत येई
एके दिनी काय होई भाजीवाला बुट्टी मारी
आजीबाई वाट पाही भाजीवाला गायब होई ४
जुनापाना वाडा पडी गडगंज मॉल होई
सारे तिथे भाजी घेती ताई माई सासूबाई
भाजीवाला दु:खी होई व्यथा त्याची कुणा सांगी
पोटावर पाय येई कपाळावर हात मारी ५